संकल्पाला मारो गोली...
>> बुधवार, ५ जानेवारी, २०११
चला, एक वर्ष कमी झालं आपल्या आयुष्यातलं. [मी दु:खी, निराश वगैरे आहे आणि म्हणून मी हे इतकं निराशावादी वाक्य लिहिलंय, असे अजिबात समजू नका वाचकहो :) ही सत्य परिस्थिती आहे की नाही, सांगा बरं]
तर सर्वांना नवीन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
२०१० कसं संपलं ते कळायच्या आत २०११ ने हळूच प्रवेश केला. म्हणजे माझ्यासाठी तरी हळूच. कारण मी विशेष वेगळ्या प्रकारे ते "सेलिब्रेट" केलं नाही. पार्टी, औटींग, केक कापणे, ड्रिंक्स घेणे असे काहीच प्रकार घरी कुणी केले नाहीत. घरीच अंडाकरी, पुलाव असा बेत केला. नेहमीसारखे ठरलेल्या वेळी जेवलो आणि नेहमी १२ ला झोपतो तसेच ३१ डिसेंबर लाही झोपलो. थोडेफार फटाके ऐकू आले बाहेरून एवढच! म्हणून म्हणलं, की माझ्यासाठी हळूच होता २०११ चा प्रवेश.
असो. हे सगळं सांगायचा उद्देश नाहीच्चे. नवीन वर्ष सुरु झालं की एक प्रश्न वारंवार विचारला जातो सगळीकडे, "काय मग, नवीन वर्षाचा संकल्प काय तुमचा?" So called "New year resolution" .
मला एक कळत नाही, आपण मराठी माणसं. आपण जानेवारी पासून का बरं सोडायचा संकल्प? आपल्याला चांगली २-२ वेळेला आहे ना संधी संकल्प सोडायला, गुढीपाडवा, आणि दिवाळी पाडवा. आपली नवीन वर्षं तेव्हा सुरु होतात ना? अर्थात आपण जरी सर्व गोष्टींसाठी इंग्लिश नवीन वर्ष गृहीत धरत असलो, तरी आपल्या मराठी प्रथेनुसार हेच दोन आपले नवीन वर्षाचे पहिले दिवस आहेत. सोडायचा असेल तर या दिवशी सोडावा एखादा संकल्प.
दुसरा मुद्दा हा, की संकल्प सोडायला एखादा ठराविक दिवसच का बरं असावा? आलं मनात, आणि सोडला संकल्प असं झालं समजा तर बिघडलं कुठे? तसाही १ जानेवारीला सोडलेला संकल्प, मंडळी २ जानेवारीला विसरलेली असतात, हे एक "general observation" आहे.
आपल्याकडे "Days" चं फार पेव फुटलंय गेल्या काही वर्षात-
प्रेम व्यक्त करायला काय तर म्हणे, "Valentine's day",
मैत्री व्यक्त करायला " Friendship day",
"Mother's day ",
"Father's day"
एक नी दोन. इतके सगळे डेज साजरे करतो आपण, पण Valentine's day ला जुळलेले प्रेम हे अभेद्य असतंच असं कुठे लिहिलयं? Friendship day ला झालेली मैत्री कधीच तुटणार नाही याची खात्री ब्रम्हदेव तरी देईल का हो? Mother's day, Father's day साजरे करणारे पब्लिक "आई वडील आता कायमचे गाव सोडून आपल्याकडे राहायला येणार" असं कळल्यावर "माझी प्रायव्हसी जाणार आता" असा विचार करताना दिसतं. मग काय उपयोग या Days चा? भावना व्यक्त करायला अश्या Days चा दुबळा आधार का घेतला जावा?असो, विषय इतर Days चा नाही. विषयांतर न करता नवीन वर्षाच्या संकल्पांबद्दलच बोलणं चालू ठेवू आपण.
तर या संकल्प प्रकरणाची लागण कंपनीत झाली नाही तर नवलच म्हणावं लागेल. माझा बॉस एक महा गंडलेला प्राणी आहे. तो कशावरही मीटिंग घेऊ शकतो. "नवीन वर्षाचे संकल्प" यावर मीटिंग झाली आमची मधे. लोक काय काय पतंग उडवत होते माहितीय? एक काय म्हणे तर "मी नवीन प्रोजेक्ट आणेन" , एक म्हणाला, "आहे हा पूर्ण करेन", तर तिसरा म्हणाला, " इतकं काम करेन की तुम्हाला नको असलं तरी मला प्रमोशन द्यावंच लागेल"
ही सगळी मंडळी कामचुकार म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांचे संकल्प ऐकून बॉस ला अगदी भरून आलं असेल त्या दिवशी. आणि ते पूर्ण होणार नाहीयेत ह्याची खात्री पण झाली असेल. :)
असे प्रश्न मला कुणी विचारले तर मी अतिशय निरुपद्रवी अशी उत्तरे देते. अर्थात माझ्यासाठी निरुपद्रवी. :) जसे की कार चालवायला शिकणे, एखादी नवीन भाषा शिकणे-फ्रेंच, जपानी इ.इ., किंवा मग वर्षभरात एकही चप्पल, पर्स न घेणे वगैरे. जे मोडले समजा तरी मला काही तोटा नसतो. आणि ते मोडतात म्हणण्यापेक्षाही सुरूच होत नाहीत कधी!
तर असं कुणी समजा मला विचारलंच तर या वर्षीचं माझ उत्तर आहे, "संकल्प न करण्याचा संकल्प". आणि ते पाळण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे, असं म्हणतेय तरी. पाहू काय होतं ते.

Labels:
माझिया मना जरा सांग ना
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा