सारेगमप लिटिल चॅम्प्स चा अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल.

>> सोमवार, ९ फेब्रुवारी, २००९

८ फेब्रुवारी २००९ ...
सकाळपासून महाराष्ट्रातील प्रत्येक संगीत रसिकाला संध्याकाळच्या "सारेगमप महाअंतिम फेरी " चे वेध लागले होते. प्रत्येक जण दुसऱ्याला बजावून सांगत होता, की बाबारे संध्याकाळी काहीही बेत ठरवू नकोस. महाअंतिम फेरी चुकवायची नाहीये मला. सगळेजण आपापली कामे संपवून ७.३० च्या आत घरी परत आणि बरोब्बर ७.३० वाजता टीव्ही चालू झाले सगळ्यांचे....
सुरुवात छान झाली. सगळ्या स्पर्धकानी मिळून एक समूहगीत सदर केले. त्यानंतर "फॅन्सी ड्रेस राउंड" सारखी एक फेरी झाली.म्हणजे, तुम्हाला आठवत असेल तर दिवाळी च्या वेळी जुन्या काळातील काही गाणी या मुलानी सादर केली होती, मूळ गाण्यातल्यासारखे कपडे घालून. तीच सगळी गाणी या फेरीत झाली. आर्या ने "आता कशाला उद्याची बात", रोहितने "वासुदेवाची स्वारी", प्रथमेशने "सुंदरा मनामधे भरली", मुग्धाने "छड़ी लगे छम छम" आणि कार्तिकीने "मन सुद्ध तुज" ही गाणी गायली. त्यातल आर्या आणि प्रथमेश ची गाणी मस्त झाली.

आपले ज्यूरी म्हणजे सुरेश वाडकर, देवकी पंडित, संजीव अभ्यंकर, आशा खाडिलकर आणि श्रीधर फडके ही मंडळी मनापासून स्पर्धकांची गाणी ऐकत होती. दाद ही देत होती. बरेच दिग्गज कलाकार, गायक, संगीतकार या छोट्या गंधर्वांना आशीर्वाद देण्यासाठी खास उपस्थित होते.

त्यानंतर आपल्या महागयिकेने आणि आत्ताच्या विश्वगयिकेने, अहो म्हणजे वैशाली भैसने-माडे हिने "घन रानी" आणि "सात समंदर" ही गाणी पेश केली. नेहमीप्रमाणेच उत्तम.

मग आपल्या स्पर्धकांच्या हिंदी गाण्यांचा राउंड झाला. पण सगळी गाणी आधी गायलेलीच गायले हो सगळे. त्यातल ही प्रथमेश च "सूरत पिया की" अप्रतिमच. शब्दच नाहीत माझ्याकडे. आर्याने "वंदे मातरम" छान गायल. मुग्धाने "ये इश्क हाय" छान गायल. पण तिच वय लहान असल्याच मात्र जाणवल या गाण्यात. अहो जीव केवढासा तिचा. पण पोरीने आत्तापर्यंत जोरदार लढत दिली सगळ्या मोठ्या मुलाना.
ही फेरी झाल्यावर असे जाहिर करण्यात आले की आता sms करायची वेळ संपली आहे आणि सगळे ज्यूरी आत जाउन निर्णय घेणार आहेत.
शेवटचा राउंड ही नव्या गाण्यांचा नव्हताच. पूर्वी गायलेलीच पण जरा "ढ़िन चॅंग" गाणी होती. ही सगळीच गाणी मस्त झाली. आर्याने "छम छम", मुग्धाने "डोक फिरलया", कार्तिकिने "नवरी नटली" आणि "मोदक" प्रथमेशने त्याच्या नेहमीच्या स्टाइल पेक्षा चांगलच वेगळ "डिपाडी डिपांग" उत्तम रितीने सादर केल. रोहित ने तर "मोरया मोरया" हे गाण खरच "चाबुक" गायल हो. बरेच चढ़ उतार असुनही ओरिजनल वाटाव अस झाल अगदी. तसाही परफॉर्मेंस देण्यात रोहित भन्नाट च आहे...

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत जितक्या महाअंतिम फेरया झाल्या त्यामधे सारखे सारखे sms किती आले ते वाचून लोकांची उत्सुकता ताणणारया पल्लवीबाईनी एकदाही सांगितले नाही की कुणाला किती sms आले आणि कोण किती पुढे आहे. मुले येतायत, गातायत आणि जातायत. जरा विचित्र वाटल होत बघताना.

शेवटची फेरी झाली आणि झाsल.... संपली स्पर्धा...बघणार्यांच्या पोटात हाs भला मोठा गोळा. निकाल सांगण्यासाठी खळेकाकाना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले. त्यानी प्रस्तावानेखातर छोटस भाषण केल, की तुम्ही सगळ्या मुलानी शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास करा वगैरे... आणि एवढे बोलून लोकांच्या पोटातला गोळा फोडला. महागायिका कोण तर म्हणे "कार्तिकी गायकवाड"
अर्ररर. माझा अशक्य भ्रमनिरास झाला हो. मी प्रथमेश ,आर्या किंवा रोहित यांच्या पैकी कुणाच्या तरी नावाची अपेक्षा केली होती. या सगळ्या ज्यूरीना हिच्या गाण्यात कुठे शास्त्रीय संगीत दिसल देव जाणे. नुसते अभंग तर गायली. कधीतरी आपल एखाद भावगीत, भक्तिगीत, लोकगीत. तिच्या त्या "नवरी नटली" ने तर माझ फारच डोक उठल होत राव. बर त्यात तिचे उच्चार स्पष्ट, शुद्ध नाहीत. बाकीचे चौघे कितीतरी पटीने कार्तिकी पेक्षा चांगले आहेत. पण.......... असो। त्यातल्या त्यात एक चांगल झाले की संगीत शिक्षणासाठी सगळ्याना सारखच बक्षिस मिळालय.
सारेगमपच्या पहिल्या सेशन च्या वेळी असच झाल होत. आठवतय का? ३ जण अंतिम फेरीत गेले होते. अभिजित कोसंबी, मंगेश बोरगावकर आणि अनघा ढोमसे. तेव्हाही sms चा काहीतरी घोळ झाला होता. अंतिम फेरी आधी कधीही sms मधे पहिला नसलेला कोसंबी अंतिम फेरीत एकदम महागायक च बनला(आणि हिंदी सारेगमप च्या पहिल्या १-२ राउंड्स मधेच उडाला पण). तेव्हा देखिल मंगेश आणि अनघा कित्येक पटीने उत्कृष्ट गायक होते.
चालायचच. असे धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल काही नविन राहिले नाहीत. आता सवय करून घ्यायला हवी आणि पुढच सारेगमप बघायला तयार ही व्हायला हव. नाही का?

(वि.सु : वरील लेख वाचून कुणाला वाईट वाटल असेल किंवा कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व: )

10 comments:

Dk ९ फेब्रुवारी, २००९ रोजी ८:५५ PM  

Don't expect anythin! ;) [My Boss's fav. quote :( ]

kas aahe gunvttecha graph vagaire bghun kadachit 1le bakshees dile asawa ;) aataa kunalaa na kunaal tari milnaarch hote na te Gaykwad la milaale evdch. baakiche hi kadachit bhosle, desai aste tar te evdhe lagle naste (1 shkyta ji chukichee asu shkte)

khartar 5stars aahet ty paikee kuna 1kalaa vegele kraaychee garaj nvhtee as aapl mala vaate

साधक १० फेब्रुवारी, २००९ रोजी १२:१२ AM  

तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. कार्तिकी जिंकेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. सर्वजण प्रथमेश किंवा आर्या जिंकायचीच वाट पहात होते. तुमचं बरोबर आहे. जी गाणी जमत नाहीत तिला कार्तिकी ने बरोबर बगल दिली. उदा नाट्यसंगित. तिला सुरत पिया की गायला लावा. जर ते गाता येत नसेल तर ती महागायिका कशी ठरते? फोक जर क्लासिकल पेक्षा श्रेष्ट ठरवायचे म्हटले तर हिमेश इला अरुण हे उपट्सुंभे मोठ्या क्लासिकल कलाकारांपेक्षा मोठे ठरतील. क्लासिकल कलाकारांची इथे नाव देत नाही कारण हिमेश सोबत तुलना करुन मी त्यांचा अपमान करु शकत नाही.
कोंबडी पळाली किती वाईट गायलं तिने उलट प्रथमेश एवढा चांगला गाउन विजेता नाही??? याला काहीच अर्थ नाही. आता तर लोक कहर करत आहेत. माउली कार्तिकीच्या गळ्यातून गातात म्हणे. कार्तिकीदेविंचा विजय असो.
डोबलाचा विजय. ती गात असेल चांगली पण तिच्या पेक्षा १०० कोस पुढे असलेले विजेते होत नाहीत याचा खेद वाटतो.

Bhagyashree १० फेब्रुवारी, २००९ रोजी १२:५७ AM  

tumhala h result awdla nahi, mhanun tumhi kartiki la kasehi bol thevavet he patat nahi..!

lahan mulanbaddal boltay, jara bhaan asudya! ticha kay dosh ahe yat?
nave thevaychi ti zee la theva!

lokanchya emotions na nusta poor aalay!! :|

Abhijeet १० फेब्रुवारी, २००९ रोजी ६:११ AM  

अरे व्वा!!!
साहिच !!!
मला खूप आनंद झाला तुमची प्रतिक्रिया वाचून. अशी दिलखुलास दाद देणारे फार कमी असतात. खूप खूप आभार!!!
तुमच्या ब्लॉग पहिली प्रतिक्रिया पण माझीच आहे. मस्त योगायोग आहे हा.
तुमचे लेखन ही सर्वांग सुंदर असते. भविष्यामधे जास्तीत जास्त चांगले लेख तुमच्या ब्लॉग वर वाचायला मिळावेत हीच अपेक्षा !!!

आपला विनीत,
अभी

Kiran १० फेब्रुवारी, २००९ रोजी ११:०० AM  

हो मला ही रिज़ल्ट्स थोडे धक्कादायक वाटले पण ठीक आहे सगळीच मुले खूप छान गातात.
पण आर्या किंवा प्रथमेश जास्त डिज़र्विंग वाटले

ऋयाम १० फेब्रुवारी, २००९ रोजी ११:५० AM  

asude aho.
chalaychach.

evadha kashala chidayacha?? lahan mula ahet ti ekdam...
apalyala changali gani aikaila milali he mahattawacha.... :)

btw, changala blog distoy...
keep writing...

Monsieur K १० फेब्रुवारी, २००९ रोजी ६:१४ PM  

yeah.. even i was kind of shocked coz i was expecting either Prathamesh or Arya to win!
and surprisingly, the end for the show was kind of below par.. doesnt mean that Kartiki didnt deserve or anything.. she's talented as well.. but yeah, the others did seem to be better IMHO..
nevertheless, its good that all 5 of them have got scholarships to pursue music.. and hopefully, they'll make good use of the opportunity given to them..

Ketaki Abhyankar ११ फेब्रुवारी, २००९ रोजी १२:३१ PM  

pratikriya dilyabaddal sarv vachakanche abhar. sagali mule changali gaat hoti he tar nirvivad satya ahe. pan jevha mahagayak / gayika nivadanyachi spardha asate tevha to / ti hi ashtpailu ahe ka ani sarv pakarchi gani titkyach takadine gau shakato/te ka, he baghane jast mahatvache ahe ase mala vatale. kartiki var maza personaly kahich akshep nahi. akshep ahe to changali ani kharokhar sarv prakarchi gani gau shakanari mule asun dekhil tyanchyavar anyay zalyabaddal. kunachyahi bhavana dukhavanyacha maza hetu nahi ani tasa adhikahi nahi ...shevati pratyekacha apapla view asatoch na.. :)

अभिजित पेंढारकर १७ फेब्रुवारी, २००९ रोजी १०:०३ PM  

माझ्याविषयी तुम्ही विचारलेल्या प्रश्‍नाबद्दल नेमकं कुठे उत्तर द्यावं, हे कळलं नाही. म्हणून इथे पोस्ट करीत आहे. हो. तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे "होय' अशी आहेत.
मला ई-मेल केलंत, तरी चालेल. ब्लॉगच्या डोक्‍यावर माझा पत्ता आहेच!

PATIL २० ऑक्टोबर, २०२० रोजी १०:१३ PM  

खुप छान माहिती आहे.आमच्या ब्लॉगल पण नक्की भेट द्या.
JIo Marathi

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP