चुकीची ऐकलेली गाणी

>> गुरुवार, २९ जानेवारी, २००९

माझी एक जुनी सवय आहे, की जर गाण्यातला एखादा शब्द किंवा वाक्य कळले नाही तर आपल्याला जे यमकाप्रमाणे बरोबर वाटतं ते बिनधास्त ठोकुन देणे. अशी काही चुकीची ऐकू आलेली गाणी खाली देत आहे ...
--------------------------------------------------------------------------------------------------
"देवदास" मधे एक गाणे आहे. "काहे छेड मोहे",त्या मधे माधुरी च्या आवाजातल्या काही ओळी आहेत. एक वाक्य ती म्हणते, "आहट सुन जियरा गयो धडक धडक धडक",..
ही ओळ मी बरेच दिवस,"आह ठुसुम जियरा गयो धडक धडक धडक" अशी म्हणायचे.
--------------------------------------------------------------------------------------------------
महानंदा या सिनेमातील एक गाणे...
मागे उभा मंगेश ..त्या मधे एक कडवे आहे।

जन्मजन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी
विरागी की म्हणू भोगी
शैलसूतासंगे गंगा, मस्तकी वाहे

हे मला कसं ऐकु यायचं माहितिय?
जन्मजन्मांचा हा योगी, संसारी अनंत भोगी
विरा कीर्ती म्हणू भोंगी (भोंगी म्हणजे आमच्या सांगली कडे सिमला मिरची)
शैलसूतासंगे रंग, मस्तकी वाहे.

मला वाटायचं, की कसलं गाणं आहे, शंकराला "भोंगी" काय म्हणते?, आणि म्हणते ते म्हणते आणि वर डोक्यावरुन रंगाची गंगा का वाहवते?

----------------------------------------------------------------------------------------------

"सारेगमप लिटिल चॅम्प्स" मधल्या मुग्धा ने "एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाये तुझी कोल्यावरी" .. हे गाण
"एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाये तुझी कोल्ह्यावरी.. अस म्हणल होत । तिला अवधूत दादा ने नंतर सांगितले पण होते, की बाळा, ते "कोल्यावरी" असे आहे. आणि यावर माझा आणि माझ्या "अहों" चा बराच वाद झाला. त्याचं म्हणणं ते कोल्ह्यावरी च आहे. मी बरच सांगुन पाहिल की एकविरा ही कोळी लोकांची देवी आहे, त्यामुळे ते "कोल्यावरी" असे आहे. पण छे हो, पटायलाच तयार नाही त्याला. त्याच्या logic प्रमाणे,त्या देवीला बळी द्यायची पद्धत असेल आणि म्हणुन बळी साठी आणलेल्या "कोल्ह्यावर" तिची नजर असणारच...आता मला सांगा, कोंबडी, बकरा, अगदी जुन्या काळी रेडा पण बळी दिलेला ऐकलाय मी, पण कोल्हा बळी दिलेलं अजुन तरी कानावर आल नाही. तुम्ही ऐकलय का?
------------------------------------------------------------------------------------------------



4 comments:

Unknown ३० जानेवारी, २००९ रोजी १२:३३ AM  

तुमच्या ’अहों’चे लॉजीक तर छानच, हसून हसून दमलो... :)
छान लिहीता आहात.तुमच्या ब्लॉगला शुभेच्छा!

माझ्या संकेतस्थळाचा आपल्या ब्लॉगवर उल्लेख केल्याबद्दल आभारी आहे.

घेऊन टाक! (http://ghewoontaak.co.cc)

Vaidehi Bhave ३० जानेवारी, २००९ रोजी २:३२ AM  

छान आणि वेगळ्या विषयावरचे पोस्ट...हलके फुलके!

मराठी पाककृती

Some Little Greens १ फेब्रुवारी, २००९ रोजी ८:५७ PM  

Nice post.

संकेत आपटे २ डिसेंबर, २०१० रोजी ६:२४ AM  

मस्त. ‘अहों’चं लॉजिक तर एकदम भार्री आहे. कोल्हा देवीला बळी देतात ही नवीन माहिती मिळाली...

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP