स्वप्न
>> शुक्रवार, १९ डिसेंबर, २००८
आहा!!! "स्वप्न" या शब्दात देखिल किती जादू आहे. नुसत्या उच्चाराने सुद्धा असे वाटत की आपण एखाद्या उबदार दुलईत गुरफ़टून झोपलो आहोत आणि काहीतरी छानशी हवीहवीशी गोष्ट पाहत आहोत. पण सगळ्यानाच अशी हवीहवीशी स्वप्ने पडतात असे नाही।
काही स्वप्ने उदास तर काही हसू येतील अशी. काही कंपनी मधील कामाची तर काही कॉलेज मधल्या अफेयर्स ची
अहो माझ्या एक मैत्रिणीला कायम एक स्वप्न पडायच. कॉलेज मधील एक सर, शाळेतल्या वर्गामधे, काहीतरी
शिकवतायत(हे काहीतरी म्हणजे बडबडगिते नसावित). मला सांगा, कॉलेज मधल्या सर ना शाळेत जाउन शिकवायाची काय गरज?
तिलाच अजुन एक स्वप्न पडल। तिचा एक नातेवाईक अमेरिकेला जाणार होता। त्याला निरोप द्यायला ही बंदरावर गेली. shocked? हो त्याला तिने स्वप्नात बोटीने पाठवल अमेरिकेला। बरोबर मी होतेच। (उगीचच हा) आणि त्याची बोट समुद्रकाठाच्या वाळुतुन निघाली सुद्धा आणि आम्ही दोघी पाण्यातून आमच्या स्पिरिट गाडीवरून।
आहे ना ग्रेट स्वप्न? मला खात्री आहे माझ्या ब्लॉग मधे लिहिण्यासारखी काही भन्नाट स्वप्ने तिला अजुनही पडत असणार.तिची खसियतच होती अशी डोक्याला त्रास न देणारी स्वप्ने पड्ण्याबद्द्ल.
मला स्वत:ला सुद्धा अशी काहिच्या काही स्वप्ने पडतात कधी कधी.
"मनी वसे ते स्वप्नी दिसे" म्हणतात ते खरच आहे. मी एकदा कुठला तरी थ्रिलर सिनेमा पाहून आले. कुणीतरी कुणालातरी कशा हुशारीने पाठलाग करून मारत हा सिनेमाचा विषय.
झाले... त्याच दिवशी रात्री मला स्वप्न पडल॥
मी घरात एकटीच। अचानक मला समोरच्या झाडावरुन कुणीतरी आमच्या अंगणात उडी मारली असे वाटल. मी घाबरत घाबरत बाहेर डोकावून पहिल तर एक काळे कपडे घातलेला माणूस दबा घरून बसला होता.
मी या संकटाचा हुशारीने सामना करायचा असे ठरवल। आणि घरातला कॉर्डलेस फ़ोन उचलला। (इथे माझ स्वप्न कशी कलाट्णी मारत बघा हा आता. तुमच्या मनात नक्कीच आले असणार की आता हिने पोलिसाना फ़ोन केला असेल आणि पुलिस येउन त्या माणसाला पकडून घेउन गेले असतील। दी एंड। यात कसला आले हुशारीने सामना वगैरे. पण नाही. वाचा तर पुढे) मी तो फ़ोन घेउन बाहेर गेले आणि त्या माणसा समोर उभी राहिले. व एक जोरदार गर्जना केली। "मी तुला सोडणार नाही" वगैरे वगैरे॥
आता माझ्यासारखी किरकोळ मुलगी समोर आल्यावर तो गुंड घाबरणार आहे का? त्याने घराच्या उघड्या दारातून आत मुसंडी मारली। मी त्याच्या मागे पळू लागले। तो कपाटाकडे वळल्यावर मी फ़ोन च एरिअल त्याच्या दिशेने रोखून जिवाच्या आकांताने फ़ोन मधल "O" हे बटन दाबल. आणि अहो आश्चर्यम ॥ एरिअल मधून धडधड गोळ्या बाहेर पडत होत्या आणि तो मेला। मी आनंदाने ओरडले "हुर्रे" , आणि आईने तोन्डावरच पांघरुण खसकन ओढले।
काही का असेना, पण मी स्वप्नात तरी एका गुंडाला धूळ ,नाही नाही गोळ्या चारल्या.
आता बहुतेक मला असाही स्वप्न पडू शकत की त्याला मारल्याबद्दल मला "bravery award" मिळाले वगैरे
2 comments:
स्वप्नांचा आलेख मस्तच!
स्वप्न हे एक गूढच आहे. मलाही अशी कायच्या काय स्वप्नं पडतात...कशाचा कशाला मेळ नसलेली. पण मजा येते, स्वप्नं बघायला! नाही का?
काय मस्त लिहिलं आहे. आवडली पोस्ट. :-)
टिप्पणी पोस्ट करा