ढील दे ढील दे दे रे भैय्या

>> शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

उद्या संक्रांत- आणि शनिवार पण. अर्थात सुट्टीचा दिवस. म्हणजे कंपनीतले सगळे सहकारी आपापल्या घरी असणार. मग कशी काय एकत्र साजरी करायची ती... आजच केली तर?"

हे विचार आमच्या कंपनीच्या मानव संसाधन (HR) चमूचे. हे लोक नुसते विचार करत नाहीत. लगेच त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला चालू करतात. अर्थात सर्व राज्यातले लोक इथे एकत्र आले असल्याने "तिळगुळ वाटणे आणि गोड बोला म्हणणे" याही पलीकडे जाऊन काहीतरी वेगळी कल्पना येणार याची खात्री होतीच सगळ्यांना. अपेक्षेप्रमाणे आज सकाळी सकाळी एक मेल आली, की 'आज आपण "पतंग महोत्सव" साजरा करणार आहोत. पतंग बनवणे आणि उडवणे अशी एक छोटीशी स्पर्धा असेल. उत्सुक मंडळीनी आपापली नावे नोंदवावीत. दुपारी २-४ या वेळेत सगळ्यांनी जवळच्या पटांगणावर जमावे. तिथेच सर्वांना पतंग बनवण्याचे समान देण्यात येईल. ज्याचा पतंग आकर्षक आणि उंच उडणारा बनेल, त्याला कंपनीच्या कल्चरल क्लब कडून बक्षीस'

हुर्रे...सर्व पब्लिक खुश. बरेच दिवसात काही नवीन कल्पना आल्याच नव्हत्या त्यामुळे जरासे कंटाळलेले चेहेरे उत्साहाने नावे द्यायला सरसावले.
पाहता पाहता २ वाजले. आमचा ५ जणांचा कंपू तयारीने पटांगणावर पोचला. 
साहित्य मिळवण्यासाठी एकच झुंबड उडालेली होती. तिथून साहित्य मिळेपर्यंत २० मि. गेलेली होती. आम्ही सगळे घाईघाईने डोकी लढवायला लागलो. अरेच्च्या, पण येतोय कुणाला पतंग बनवता? मी गुगलिंग करून थोडीशी लेखी माहिती जमवली होती, पण एक जण पुढे सरसावला, मी करतो म्हणून. सर्वांना जरा हायसं वाटलं.
२ काठ्या मापात कापून वगैरे कामाला सुरुवात झाली. चिरमुरे कागद (शाळेत असताना कार्यानुभव हा विषय ज्यांना होता, त्यांना हा कागदाचा प्रकार माहित असेलच) दिलेला होताच. आम्ही थोडेसे जिलेटीन कागद, गोटीव कागद आणले होतेच.
त्यातल्या त्यात अनुभवी मंडळीनी पतंग बांधायला घेतला.आम्ही फारसे ज्ञान नसणारे लोक चुटपूट हातभार लावत होतोच. 
एकीने शेपटी बनवायला घेतली. एकाने त्या पतंगाला नाक, तोंड, डोळे असे अवयव बनवले. असे करत करत मांजा बांधायची वेळ झाली. तेही काम त्या अनुभवी कार्यकर्त्यानेच पार पाडले. वेळ संपल्याची घंटा पण वाजली होतीच. आमचा छान छान तयार झालेला पतंग घेऊन परीक्षकांना दाखवण्यासाठी आम्ही रांगेत उभे राहिलो आणि एका फेरीतून सुळकन पुढे गेलो पण.
 आता खरी परीक्षा होती.... तयार झालेला पतंग उडवून दाखवणे. आम्ही २-३ मुली होतो, त्यांना विशेष ज्ञान नव्हतं पतंग उडवण्याचं.त्यामुळे हे काम मुलांनी स्वत:वर घेतलं. मांजा वगैरे
 बांधून एकजण दूर जाऊन उभा राहिला पतंग हातात धरून, आणि दुसऱ्याने ढील दिल्यावर  झू ssss मकन उडाला आमचा पतंग. सगळ्यांनी एकाच जल्लोष केला. काय मस्त दृश्य होतं ..आहा..

पण हाय रे देवा.. काहीतरी गडबड झाली आणि हळू हळू खाली यायला लागला तो. पाहतो तर लक्षात आलं की त्याचे ते दिमाखदार पुछछ गायब होते. आम्ही त्याची शेपटी नीट चिकटवलीच नव्हती, ती पडली कुठेतरी. असो, जेव्हा उडायला पाहिजे तेव्हा तर उडाला होता तो. आता बघू निकाल कधी लागतो ते. आमच्यापेक्षा मस्त मस्त पतंग बनवलेत लोकांनी, पण अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे, नाही का?

अरे हो, सर्वाना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!! तीळगुळ घ्या आणि (थोड़े दिवस तरी) गोड बोला :)
11 comments:

भानस १४ जानेवारी, २०११ रोजी ७:५८ म.उ.  

केतकी, अगं पतंग काय मस्त् दिसतोय. सहीच! तुम्ही मज्जाच केलीत की.

तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला! ( सगळे दिवस जमवा बुवा... :D:D )

Yogesh's Space १४ जानेवारी, २०११ रोजी १०:४६ म.उ.  

बंद करा हा ब्लॉग ........ माझ्या बायकोच मुंडक उडवलस आणि तरीही आम्ही गोड बोलाव????
नाही, अजिबात नाही!! आमच्या अर्धांगिनीचा हा उपमर्द आम्ही कदापि सहन करणार नाही.

बर....राग आला आहे तरीही एक विचारव म्हणतोय........हा गोटीव कागद कसा असतो??
की तुम्ही ध चा म सारखा घ चा ग केलात!! ;)

भानस १४ जानेवारी, २०११ रोजी ११:३४ म.उ.  

:) योगेश (आपली ओळख नाही तरीही... तुमची टिपणी वाचून राहवले नाही म्हणून... असेही केतकीची खेचायची होती... :) ) काय उगाच संक्रातिला गोड गोड बोलायचे सोडून... नको ते प्रश्न, ही ही...

केतकी,सांगून टाक हा टायपो आहे ते... ;)
( रागावू नको बरं बयो... :D )

Yogesh १५ जानेवारी, २०११ रोजी १२:०४ म.उ.  

दे धमाल...लय भारी...शॉलीड मजा केली आहे की....पतंग भार्रीच आहे....तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...तिळगुळ घ्या गोड गोड बोला.. :) :)

मुक्तछंद १६ जानेवारी, २०११ रोजी १०:२५ म.उ.  

@योगेश: तुझ्या बायकोला विचारुनच तिच डोक उडवल आहे. हा हा. पतन्गापेक्षा तीच छान दिसायला लागल्यावर काय करणार :) आणि घ चा ग झालाय :) घोटीव असतो. तुम सही हो भाई

mahendra १७ जानेवारी, २०११ रोजी १०:४४ म.पू.  

मस्त लिहिलं आहेस. मज्जा केलेली दिसते. :)

Aarti १८ जानेवारी, २०११ रोजी १२:०१ म.उ.  

आमचा पण पतंग छान तयार झाला आणि तो उडतो का ते टेस्ट करायला गेलो आणि पतंगच फाटला , मग काय शेवटचे १० मिनिट उरले होते, त्यात केला परत नवीन पतंग तयार. आणि तो एकदम उंच उडाला काय मज्जा आली त्यावेळेला. बाकी पतंग महोसव खूप enjoy केला.

सिद्धार्थ १८ जानेवारी, २०११ रोजी १:२७ म.उ.  

पतंग बनवून उडवायची कल्पना चांगली होती. तुमच्या मानव संसाधन चमूमध्ये चांगले लोकं आहेत ;-)

मुक्तछंद १९ जानेवारी, २०११ रोजी २:३७ म.उ.  

@महेंद्र काका: धन्यवाद. मजा रोजच करतो आम्ही :) काम अधून मधून :P
@आरती: अगं , तुमचा उडाला तरी, उलट तुमच्या कष्टांना दाद दिली पाहिजे. आमचा पतंग आमचं समाधान व्हावं म्हणून जरासा उडाला आपला.
@सिद्धार्थ: आमच्या मानव संसाधन चमू चे लोक एकदम उत्साही आहेत. सारख्या नव्या नव्या कल्पना सुचत असतात त्यांना.

भानस २५ जानेवारी, २०११ रोजी १०:१९ म.पू.  

केतकी, अगं रूसलीस की काय? चेष्टा केली थोडीशी... माफी माफी... :)

मुक्तछंद २५ जानेवारी, २०११ रोजी ३:४२ म.उ.  

@भानस: छे छे, रुसेन कशाला. :) गम्मत चालते आम्हाला.

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP