गणेशोत्सव आणि जातीयवाद

>> शुक्रवार, ११ सप्टेंबर, २००९

गेले काही दिवस आपण सगळेमिरजेतल्या धुमाकुळाच्या बातम्या ऐकतोय. प्रकरण कुठचं कुठे जाउन पोचलंय. आधी फक्त मिरजेत झालेल्या या वादावादीचे हे लोण आता सांगली, इचलकरंजी, आष्टा, कोल्हापूर आणि जवळपासच्या गावांमधे पसरलंय. अनेक हिंसक प्रकार झाल्यानंतर घोषित केलेल्या संचारबंदीमुळे गावांमधून शुकशुकाट आहे. पण या सगळ्या प्रकारामधे सामान्य नागरिक मात्र अडकला गेलाय. काही लोकांना मार खावा लागलाय तर काहींनी हकनाक आपले प्राण गमावले आहेत. शिवाय वाहने, घरे, दुकाने यांचं नुकसान झाले ते वेगळंच.
आपला देव ही यातून सुटला नाही. अनेक ठिकाणी मूर्ति भंग करण्याचे प्रकार घडले. मिरजेतले जे हिंदू भाग आहेत तिथे मांसाचे तुकडे टाकले गेले. मग यावर प्रतिक्रिया म्हणुन मुस्लिम धार्मिक स्थळांमधे मेलेले डुक्कर टाकण्यात आले. या सगळ्या जातीय भांडणांच नक्की मूळ काय आणि अंत कुठे आहे, हेच शोधणं अवघड होउन बसलंय आता. जिथे हे सगळे मुस्लिम बांधव जन्मापासून राहतायत, तिथेच त्यांनी "जय पाकिस्तान" सारख्या घोषणा द्याव्यात? म्हणजे ह्या लोकांनी ही भारत भूमि कधी आपली मानलीच नाही का जिने त्यांना आत्तापर्यंत आपल्या मुलांप्रमाणे माया दिली? असो.... सगळेच लोक असे नाहीत हे ही तितकंच खरं.. काही असंतुष्ट समाज कंटकांच काम आहे हे.
अनंत चतुर्दशीला होणारं गणपती विसर्जन या जातीयवादाच्या गोंधळामुळे शेवटी काल करण्यात आलं. आणि तरीही अजुन सांगली मधे संचारबंदी आहेच.. सगळे नागरिक कधी मोकळा श्वास घेणार आहेत ते परमेश्वरालाच ठाउक.
मुळात हे सगळ सुरु होण्यासाठी कारणीभूत ठरलेली ती कमान खरंच एवढी आक्षेपार्ह होती का? शिवाजी महाराजांनी अफ़झलखानाला मारतानाचा प्रसंग दाखवणे यात धार्मिक भावना दुखावण्यासारखं काय आहे? तो इतिहास आहे, आणि अर्थातच घडून गेलेली घटना आहे. असे दंगे करण्याने काय परिस्थिती बदलणार आहे थोडीच?
जे आहे ते आहे. त्याचा एवढा मोठा इश्यु करून कोणाचा फायदा झाला, हे ज्यानी ही दंगल सुरु केलीय तेच जाणे..
आता हे सगळं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालय हा अजुन एक योगायोग.. शेवटी वाचकांनी या दोन गोष्टींचा संबंध आहे की नाही ते ठरवायचं आहे. होय, त्यांनी आपल्या संचार करायच्या स्वातंत्र्यावर तात्पुरती बंदी घातली असली, तरी विचार स्वातंत्र्यावर कुठे घातलीय? नाही का?

7 comments:

umesh ११ सप्टेंबर, २००९ रोजी ३:१८ म.उ.  

Khoop Chan.

Ajay Sonawane ११ सप्टेंबर, २००९ रोजी ४:४० म.उ.  

aavadala lekh , chan !

Prashant ११ सप्टेंबर, २००९ रोजी ७:१४ म.उ.  

इतिहासच दाखवला त्यात काही वाईट वाटलं तर समजावून द्या, निदर्शनं करा....
मुर्त्या फोडल्या हे अतिशय वाइट केलं.... हे सरळ सरळ धार्मिक भावनांचा अपमान आणि असहिष्णुता आहे.

Innocent Warrior १७ सप्टेंबर, २००९ रोजी १०:५६ म.उ.  

after a long time...good to see you.

nice post!!! I have also posted one post on this topic on my blog.

Vivek Gaikwad ३० डिसेंबर, २००९ रोजी २:१७ म.पू.  

Religion is the reason of all this nonsense...actually we have to think about this system...we have to leave our religions first to become a true Indian...Indian people are facing many problems...more than 70 crore people(more than 80% of Indian population) can't earn 20 rupees per day.
And stop blaming Muslims for this Issue...(I am not a Muslim or Hindu, I am an Indian.) They have also their history...Just think, they also could create the posters of the murder of our King Sambhaji...then what could you do?
And about your statue, if your god can not protect himself, then he is not a god...that was only a statue...but 5 people were killed in those riot. those 5 lives are more important than any god or statue in the world.
You can see the real fact of these riots on youtube...I personally uploaded the real videos. Please check it and reply.
http://www.youtube.com/watch?v=sSiNwSFd4BY

मुक्तछंद १३ जानेवारी, २०१० रोजी ५:२३ म.उ.  

विवेक,
तुम्ही नास्तिक दिसताय हो. मी माझ्या लेखामधे कुठल्याच धर्माच समर्थन अथवा निंदा केली नाहीये. जे चूक आहे ते चूकच आहे. आणि देव मूर्तीत आहे की नाही हे आपण मानण्यावर आहे. तुमच्या लहान भावाला किंवा मुलाला किंवा in general कुठल्याही लहान मुलाला एखाद्या परिस्थितीत स्वत:चे संरक्षण करता आले नाही समजा, तर तुम्ही त्याला वाचवायचे सोडून "if he can not protect himself, then he is not a human being" असे म्हणून निघून जाणार आहत का? आपण आपली श्रध्दा कुणाच्यात तरी मानत असतो, ती हिंदू मूर्तीत मानतात तर मुस्लिम निर्गुण श्रध्दा ठेवतात.आपापल्या श्रध्दास्थानाला इजा झालेली कुणीच पाहू शकत नाही. अफजलखानाचा शिवाजीने केलेला वध, यात मुस्लिमांच्या देवाचा अपमान झाला असे मला तरी वाटत नाही. जी वस्तुस्थिति आहे ती आहेच.

by the way, तुम्ही कुठल्या गावाचे आहत? are u from sangli/miraj? मी हे videos आधीच पाहिलेत. thank u for the comments

Vivek Gaikwad १२ फेब्रुवारी, २०१० रोजी ९:४५ म.उ.  

Yes, I am an atheist and I am from Sangli,
If you want to talk to me and ask me any question about my comment, then please call me...or give me your contact number...I will call you at your convenient time.
And you didn't give me the answer, that, if Muslims want to show their history by the poster of the murder of Our King Sambhaji then what will we do?
And also think about the other things, which I wrote in the comment...Actually I want to tell many things...But this is not the right place...Because you people don't know many things...

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP