तरुणाइला - भुलवणारा कवी.आणि डोलवणारा संगीतकार

>> मंगळवार, ३ फेब्रुवारी, २००९

ही तरुणाई ...
आभाळाची निळाइ ॥ सागराची गहराई।
हरेक क्षणाच्या डोळ्यातली रोषणाइ...

आजच्या तरुण पिढीच प्रतिनिधित्व करणार्‍या या कवितेचे शिल्पकार आहेत "तरुण" कवी "संदीप खरे".
तुम्हा आम्हा सामान्यांना सुचेल का हो, "तरुणाई" ला आभाळाइतक अथांग, समुद्राइतक खोल असे काही म्हणायला? नाही. आपली धाव कुम्पणापर्यंतच।

"जे न देखे रवि ते देखे कवी" असे म्हणतात. खरच तर आहे. उत्कृष्ट कविता जन्माला येण्यासाठी, जे पाहिल नाही ते शब्दात साकारण्याच सामर्थ्य हव. आणि जे पाहिल, त्याला हवा तसा आकार देऊन कवितेच्या साच्यात बसवता यायला हव.

संदीप खरे ला (मी एकवचन वापरते आहे कारण हा कवी अगदी आपल्यातलाच आणि आपल्यासारखाच तरुणाइने बहरलेला आहे) या दोन्ही गोष्टी सहजगत्या आणि उत्तम अवगत आहेत.
इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेला संदीप मनापासून कवितेला मानतो। हा कधी असतो एक रोमॅंटिक प्रेमवीर तर कधी असतो एक विरह्ग्रस्त असफल प्रेमिक. मधेच तो छोट्यांबरोबर छोटा होतो तर थोरांबरोबर थोर। तो शब्दातूनच एखाद्या घटनेचे वर्णन असे काही उभं करतो की बस...आपल्याला वाटत की मी प्रत्यक्ष बघतोय की काय...त्याच उत्तम उदाहरण म्हणजे "कसे सरतील सये" ही कविता. नुसती ऐकली तरी असे वाटत की आपल्या प्रियकराच्या काही काळाच्या त्या विरहाने ती मुलगी आपल्या गुलाबासारख्या २ नेत्रातुन टप टप आंसू वाहते आहे। वाह वाह, काय कल्पना आहे. हे असे विचार कवीच करू जाणे.

लहान मुलांचा "अग्गोबाई ढग्गोबाई" हा अल्बम तर खुपच छान जुळून आलाय. सगळी गाणी एका पेक्षा एक.
"दूरदेशी गेला बाबा " तर खुप "touching" आहे तर "सुपरमॅन" मधे चक्क सुपरमॅन आणि हनुमान यांची ओळख आहे , माहितीय?

"कधी हे कधी ते", "मी गातो एक गाणे", "दिवस असे की", "आयुष्यावर बोलू काही", "नामंजूर", "सांग सख्या रे", "अग्गोबाई ढग्गोबाई" इतके सगळे अल्बम्स आत्तापर्यंत प्रदर्शीत झालेले आहेत। तसेच "मौनाची भाषांतरे" आणि "नेणिवेची अक्षरे" हे कविता संग्रह ही त्याच्या खात्यावर जमा आहेत.

त्याच्या सर्व गाण्याना सुमधुर संगीत देणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. सलिल कुलकर्णी। अतिशय गोड पण तितकाच खणखणित आवाज ही दैवी देणगी असलेला हा गृहस्थ M.B.B.S. आहे। पण संगीत हेच कार्यक्षेत्र मानलेला सलिल "आयुष्यावर बोलू काही" या कार्यक्रमात संदीप ची पुरेपूर साथ देतो।

सलिल ची मला आवडलेली काही गाणी म्हणजे "पाउस असा रुणझुणता", "हे भलते अवघड असते" आणि "संधिप्रकाशात"। अप्रतिम गाणी....

खरया अर्थाने आजच्या तरुण पिढीला आपल्या शब्दानी भुलविणारया आणि संगीताने डोलविणारया या जोड़गोळीला भविष्यात देखिल असच भरभरून यश मिळो हीच देवाकडे प्रार्थना।

3 comments:

विनायक ४ फेब्रुवारी, २००९ रोजी १०:२८ म.उ.  

namsskaar mee vinaayak paachalag
ek lekhak aani vaachak
malaa aaple likhaan aavadale
mee aaplaa lelkh yaa sitevar taaklaa tar chaalel ka naahee tar udaven
www.maratilegends.tk
adhik maahiteesaathee he paha
www.misalpav.com/tracker/2815
maajhaa mail
pachalag@in.com

Innocent Warrior ७ फेब्रुवारी, २००९ रोजी ८:२५ म.उ.  

मी माझ्या ब्लॉग दोन दिवसांपूर्वी संदीप खरे च्या नवीन कवितेवर एक लेख टाकला आहे. तू तो लेख खालील लिंक वर पाहु शकतेस.

http://maalkauns.blogspot.com/2009/02/blog-post_06.html

-अभी

संकेत आपटे २ डिसेंबर, २०१० रोजी १०:१० म.पू.  

माझाही आवडता कवी आहे संदीप. मस्तच कविता करतो तो. आणि सलील कुलकर्णीने संगीतबद्ध केल्यावर त्या कविता आणखीनच छान होतात. :-)

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP