बटाट्याचा शिरा:

>> बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

शिरा म्हणलं की रव्याचा शिरा हे समीकरण आपल्या डोक्यात पक्कं बसलेलं असतं. पण मला मात्र बऱ्याचदा शिरा खाल्ला की जळजळतं.  अजून कशापासून वेगळ्या प्रकारचा शिरा बनवता येईल याचा शोध घेत असताना मला बटाट्याचा शिरा सापडला. रताळ्याचाही असाच करता येतो. नक्की करून पहा.

बटाट्याचा शिरा:
साहित्य:
१ उकडलेला बटाटा (मोठा)
१/४ वाटी साखर
१ मोठा चमचा तूप
१/२ चमचा वेलदोडा पावडर
बेदाणे, बदामाचे काप

कृती:
१. बटाटा सोलून कुस्करून घ्या.
२. कढईत तूप गरम करून घ्या, व त्यात बटाटा गुलाबी रंगावर परतून घ्या.
३. साखर व  वेलदोडा पूड घाला व २ मि. झाकण ठेवून मंद आंचेवर शिजू द्या.
४. वरून बदामाचे काप व बेदाणे घालून वाढा.2 comments:

Shraddha Bhowad १६ सप्टेंबर, २०११ रोजी ७:३८ म.पू.  

काय गं, तुझी गीता कधीपासून झाली? :)
फ़ोटो मस्त.
खालचा ताक साबुदाणाही गोरा गोरा हॅंडसम आहे.

मुक्तछंद २१ सप्टेंबर, २०११ रोजी १०:१२ म.पू.  

:) धन्यवाद.. अगं आम्ही दोघी ऑफिसमध्ये शेजारी शेजारी बसतो, त्यामुळे वाण नाहीतर गुण लागणारच ना.

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP