ताक साबुदाणा

>> बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

श्रावण म्हणलं की उपासांची रेलचेल असते अगदी. आणि उपास म्हणलं की "आता काय बरं करावं खायला?" असा प्रश्न मनात येणं अगदी साहजिकच. मग रुचिरा उघडलं जातं, निरनिराळे कुकिंग शोज पहिले जातात, रेसिपीची पुस्तके चाळली जातात आणि बनतात नवनवे पदार्थ. अशीच एक साधी सोप्पी रेसिपी इथे देते आहे. खरं म्हणजे श्रावण संपून बरेच दिवस झाले, पण पोस्ट टाकता टाकता राहूनच गेली. तर ती गोड मानून घ्या.

ताक साबुदाणा:
साहित्य:
एक वाटी भिजवलेला साबुदाणा
१/२ वाटी ताक किंवा दही
२ चमचे तूप
जिरे, मीठ,साखर
बारीक चिरलेली कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या
२ चमचे दाण्याचे कूट

कृती:
१. साबुदाणा मीठ, साखर घालून सारखा करून घ्या.
२. एका पसरट भांड्यात तूप, जिरे,मिरच्या घालून फोडणी करून घ्या व त्यात साबुदाणा घाला.
३. त्यात ताक/दही घालून मंद आंचेवर झाकण ठेवून २-३ मि. शिजू द्या.
४. घट्ट झाले असल्यास त्यात आवडीप्रमाणे थोडेसे ताक घाला व दाण्याचे कूट घाला व अजून २ मि. शिजू द्या.
४. वरून कोथिंबीर घालून गरम गरम खा. 
1 comments:

Aarti १४ सप्टेंबर, २०११ रोजी १२:०८ म.उ.  

मस्त आहे रेसिपी मी ह्याच पद्धतीने दही पोहे करते, फक्त ते शिजवावे लागत नाही भिजवलेल्या पोह्यावर फोडणी द्याची. बाकी कृती सारखीच आहे

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP