मुक्कामपोस्ट 'कंटाळा बंगला' ता.वैतागवाडी....

>> बुधवार, २५ फेब्रुवारी, २००९

काय दिवस आहे हो आजचा..सगळ्या गोष्टींचा अगदी वीट आलाय मला. सकाळपासून जे-जे काम करायच ठरवते आहे त्याला सगळीकड़े नुसता 'नन्ना' चा पाढा.

सुरुवात ऑफिस ला येण्यापासूनच झाली. आमचा घोड़ा (माझी अत्यंत आवडती स्कूटी पेप, कध्धी कध्धी त्रास देत नाही हो) काही केल्या हालायलाच तयार नाही (आजच मेली काय उसण भरली तिला, TVS च जाणे). किक मारून पाहिली पण छे...शेवटी काहीतरी करून कशीबशी एकदाची झाली चालू तर तोपर्यंत १० वाजून गेलेले. (लगेच आमच्या डोळ्यासमोर मॅनेजरचा चिडलेल्या बुलडॉग सारखा चेहरा अवतीर्ण झाला.)

तो सीन डोळ्यासमोर ठेउन, जितक्या स्पीड मधे गाडीला पळवणे शक्य होते तितक्या जोरात हाकत आणि सगळ्या सिग्नल्स ना नेहमीपेक्षा जास्त वेळ लागल्यामुळे जिथे तिथे थांबत, अशी तब्बल दिड तासाने पोचले एकदाची कंपनीत. सगळीकड़े नेहमी सारखी शांतता होती. म्हणल, 'चला इथे तरी सगळं व्यवस्थित दिसतय'. माझ्या जागेवर पोचले तर माझी नेहमीची खुर्ची कोणीतरी ढापलेली. मला दुसरी चालतच नाही. माझी खुर्ची नसेल तर माझी चिडचिड अजुनच वाढते. मग काय , तसच झाल. काम करायच सोडून आधी तो 'प्रोजेक्ट' संपवला आणि सापडली एकदाची माझी खुर्ची. म्हणतात ना.."दिवस असे की कोणी माझा नाही, अन मी कोणाचा नाही". जो तो मला त्रास द्यायला टपलेला.

मशीन चालू केलं. नेहमीच्या सवयीने मेलबॉक्स उघडला. बघते तर मेनेजर च्या 'ह्याssss' इतक्या मेल्स पडलेल्या. म्हणल, बघू निवांत. आत्ता तर एंट्री मारलीय.(आधी जीमेल पाहुया.) तासाभराने पाहिल, तर सगळ्या असाइनमेंट्स च्या डेडलाइन्स आजच..अरे देवा..काय वैताग आहे. पण काय करणार..दिवसभर खपून बरीचशी कामे मार्गी लावण्याशिवाय उरलय काय दुसरं हातात?

त्यात गाडीला किक मारून बरयापैकी कॅलरीज जळल्यामुळे दमलेही होते आणि कंटाळाही आला होता. दिवसाच्या सुरुवातीलाच इतक्या पनवत्या लागल्यावर काम करावंस वाटेल तरी का? पण...(हा 'पण' मधे मधे येउन फारच घोळ करतो नाही?) उरलेला दिवस ती रटाळ आणि कंटाळवाणी कामे पूर्ण करण्यात संपला. शेवटी शेवटी तर 'संदीप खरे' च्या कवितेतल्या त्या चाकरमान्यासारखाच मलाही 'कंटाळ्याचा कंटाळा' यायला लागला.

त्या दिवशी रात्री ११.३० वाजता, अनेक लोकानी दमलेला, थकलेला आणि खांदे पाडून चाललेला एक दु:खी जीव नक्की रस्त्यावर पाहिला असेल. देवाने आकाशातून पाहिले असेल का हो? पाहिले असेल तर त्याला नक्कीच दया आली असेल आणि तो विचार करत असेल की "मी बनवलेला इतका क्षुद्र प्राणी देखिल किती कष्टात दिवस काढतो आहे. पुढचा मानव बनवताना हा 'program' modify करायला हवा"..

8 comments:

Yawning Dog २६ फेब्रुवारी, २००९ रोजी ११:३५ AM  

Khoorchee babat same hote maze pan...amhee amchya ithe khoorchyanvar nave lihiliee ahet permanent markernee :)

aaja pahilyaandaach tuza blog pahila, khoop chhan ahe

Abhi २७ फेब्रुवारी, २००९ रोजी ४:१७ AM  

छान लिहिले आहेस.
कधी कधी असा दिवस येतो...

तर कधी कधी आठवडा पण असा जातो.

माझी खुर्ची मी पण कोणाला देत नाही.

एखाद्या गोष्टीची सवय वाईट असते.

-अभी

छोटा डॉन २७ फेब्रुवारी, २००९ रोजी ८:३७ AM  

क्लास ऽऽऽऽ

अगदी साधेसरळ पण दररोजच्या आयुष्यात घडणारे असल्याने फारच आवडुन गेला लेख.
आश्चर्य म्हणजे माझेपण खुर्चीबाबत तसेच आहे, एकदा असाअच शॉट होऊन खुर्ची न मिळाल्याने मी वैतागुन घरी निघुन आलो होतो. ;)

बाकी तुझा मेल्सचा किस्सा वाचुनही हसु आले, मला वाटत होते की मी एकटेच असे करतो.
असो.

उत्तम लेख, असेच लिहीत रहा [ व जमले तरच कामही करत जा ;) ] ....

अनामित ४ मार्च, २००९ रोजी १०:५९ AM  

खुर्चीची पाठ सैल असेल आणि वजनाने मागे मागे जाणारी असेल तर राजीनामा द्यावासा वाटतो..
खुर्चीची पाठ घट्ट हवी.. आणि handrests सुद्धा..

मी पण सांगलीच्या विलिंग्डन चा..

माझा ब्लॉग कधी वेळ असला तर पहा..मला बरं वाटेल..

gnachiket.wordpress.com

Kiran १२ मार्च, २००९ रोजी १०:३९ AM  

lihi ki ata kahitari chans...

Ulhas २३ मार्च, २००९ रोजी ११:५८ AM  

Typical Day
vachun khup maja aali :)
keep it up

Dk २६ मार्च, २००९ रोजी ४:०६ PM  

hmmm dev aikel ha nkki prog modify he karel :D

आनंद पत्रे १३ जानेवारी, २०१० रोजी ५:४९ PM  

खरंच, एखादा दिवस आपला नसतो, सर्व नष्ट्चर्य एकाच दिवशी मागे लागते...

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP